तरीही आशाताईंची पंचमदां जवळ नेहमीच एक गोड तक्रार राहिली आहे ती अशी की पंचमदांची सर्वोत्तम गाणी लतादीदींनी गायली आहेत किंवा त्यांच्या वाट्याला आली आहेत.
खरं तर हे भांडण म्हणा अथवा अन्य काही म्हणा, खूपच गोड आहे, पण आपल्याला विचार करायला लावणारं आहेच आहे.
हिंदी चित्रपटातील गाणं हे विविध अंगांनी विचार होऊनच तयार होत असतं. पहिलं म्हणजे चित्रपटातील अभिनेता / अभिनेत्री कोण, दुसरं गाण्याचा प्रसंग, तिसरं गाण्याचा मूड, चौथं गाण्याची चाल / ढंग, आणि महत्वाचे म्हणजे या सर्वांना न्याय देईल अशा संगीतकाराच्या पसंतीच्या गायकाची निवड.
यावरून असं लक्षात येतं की गाणं कोण गाणार याचे पूर्ण अधिकार बहुतेक संगीतकार राखून ठेवत व त्याप्रमाणे ते निर्माता / दिग्दर्शक / कलाकार यांना पटवून देत.
पंचमदांची लता दिदिंनी गायिलेली सर्व गाणी देणं येथे शक्य नाही, पहिलं पडोसन चित्रपटातील गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेलं, सुनीलदत्त सायराबानू वर चित्रित झालेलं व दुसरं बहारोंके सपने मधील मजरुह सुलतानपूरी यांच असंच एक मनाच्या कोपऱ्यातील गाणं..
Watch - शर्म आती है मगर..