या चित्रपटातील आज फिर जीने कि तमन्ना है गाण्याने मात्र कमाल केली. राजस्थानच्या पार्श्वभूमी वरील गाण्याचे एकंदर चित्रीकरण तर केवळ लाजवाब होते यात शंकाच नाही. जीने की तमन्ना असणारी वहिदा रेहमान बेभान होऊन नाचत असता केव्हाही पडेल की काय असं देव आनंद सारखंच आपल्यालाही वाटत रहातं..
आणखी एका कारणाने याच गाण्याने रसिकांच्या मनात काही काळापुरता का होईना संभ्रम निर्माण केला. कारण सर्वसाधारण गाण्यांप्रमाणे हे गाणे मुखड्याने सुरू न होता एकदम अंतऱ्याने म्हणजेच कडव्याने सुरू होते व आज फिर जीने कि तमन्ना है हा मुखडा नंतर येतो..
मागेपुढे याप्रकारची हिंदी गाणी आली असतीलच. फुलोंकी रंग से....लेना होगा जनम हमे हे किशोरचं असंच अवीट गाणं. मराठीतही, पावनेर ग मायेला करू... ओटी आईची मोत्यानं भरू सारखी अंतऱ्यानं सुरू होणारी गाणी आहेतच की ..
आजचं गाणं आहे अभिषेकी बुवांनी गायलेलं शांताबाईं शेळके यांचं हे बंध रेशमाचे या नाटकातील.
Watch पथ जात धर्म किंवा...