कृष्णरावांची लेक...

१९५९ सालच्या किचकवध या मराठी चित्रपटातील धुंद मधुमती रात रे, हे गाणं सर्वांनाच माहित आहे. गदिमांनी लिहिलेल्या या सुंदर गीताला संगीत दिलं होतं मा. कृष्णराव यांनी, हे कदाचित थोड्या लोकांनाच ठावूक असेल. 

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित मा. कृष्णराव (फुलंब्रीकर) मराठी संगीत नाटकांमधील गायक-अभिनेते तसेच संगीतकार होते. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी व इतर चित्रपटांतील गाणी खूपच गाजली..

सन १९३५ मध्ये कृष्णरावांना कन्यारत्न झाले, सुप्रसिध्द सिने-निर्माते व्ही शांताराम यांनी तिचे कौतुकाने उदयप्रभा असे बारसे केले. उत्तम सतारवादन करणाऱ्या व कवी-मनाच्या प्रभाताईंना वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला नसता तरच नवल..

सत्तरच्या दशकात त्यांनी संगीत दिलेल्या दोन ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या व त्यांचा विक्रमी खप झाला. मराठी भावगीत प्रकारातील पहिल्या महिला-संगीतकार म्हणून एच एम व्हीं कंपनीने त्यांचा जाहीर सत्कार केला.  

कालांतराने श्री. रामचंद्र चिटको यांच्याशी विवाह केल्याने त्यांचे नामकरण सौ. वीणा चिटको असे झाले..

सहा महिने अपार मेहनत घेऊन पं. रामदास कामत यांना नाट्य गायनाबरोबर भावगीत गायनाकडे वळवत स्वरचित गीताला त्यांनी दिलेला स्वरसाज म्हणजे आजचे गीत...

Watch - अंबरातल्या निळ्या घनाची..